आवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50000 रुपये मदत जाहीर करा-करुणा मुंडे


बीड/प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून बीड जिल्यामध्ये होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले आहे . या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचमाणे करून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकर्यांना हेक्टरी 50000 या रकमेचे मागणी स्वराज शक्ती सेनाच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी केली आहे .
मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे शेतकर्यांचा रब्बी हंगामातील हात तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे . या अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुले सध्याच्या परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे . यावरच मागील खरीप हंगामातील पिकांची देखील पावसा अभावी अशीच काहीशी परिसस्थिती पाहायला मिळालेली होती . या दोन्ही परिस्थिती शेतकरी पिळून निगला आहे . या मध्ये देखील खरीप हंगामातील मिळालेल्या कापसाला खर्च हि निगणार नाही असा भाव आहे .
वरील येकंदरीत सर्व शेतकयांचे हाल बघता या ठिकाणच्या स्वराज शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी शेतकर्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून हेक्टरी 50000 इतकाही मदत शेतकर्यांना जाहीर कारवी अशी मागणी करत आहेत . या मागणीला काही प्रतिउत्तर न मिळाल्यास बीड जिल्यातील सर्व शेतकरी वर्गाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत .

