सासुला जिवे मारण्याच्या आरोपातुन जावई व त्याच्या वडीलांची खुनाच्या आरोपातुन निदोष मुक्तता : अ‍ॅड.गंडले

Beed

बीड/प्रतिनिधी
सचिन तुकाराम कदम रा. मांडवखेल ता. जि.बीड याचे अलका हनुमान जोगदंड रा. वाणगाव ता.जि. बीड ह.मु. अंकुश नगर, बीड यांची मुलगी निकिता हिचे सचिन कदम याचे सोबत लग्न झाले होते. परंतु निकिता व सचिन कदम यांच्यामध्ये सतत भांडण करत होते ते भांडण मिळवण्यासाठी अलका जोगदंड या दिनांक. 23/ 05/2020 रोजी मांडवखेल येथे गेल्या होत्या.

 त्यांना आरोपी तुकाराम रामभाऊ कदम हे मोटार सायकलवर घेवुन गेला होता. तेव्हा अलका हनुमान जोगदंड हिला सचिन तुकाराम कदम व त्याचे वडिल तुकाराम रामभाऊ कदम यांनी शेतात घेवुन जावुन ट्रॅक्टरची धडक देवुन व पुन्हा डोक्यात दगड मारुण अलकाचे प्रेत शेतात पुरुन टाकले असा आरोपी आरोपीवर केला होता. आरोपी विरोधात नेकनुर पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र. 122/20 कलम 302,120 (ब), 202 भा.द.वि नुसार गुन्हा नोंद झाला या प्रकरणात तपासी अधिकारी लक्ष्मण केंद्रे पोलिस निरिक्षक नेकनुर पोलिस स्टेशन, यांनी तपास करुन आरोपी विरोधात चार्जशिट दाखल केले होते. त्याचा सेशन केस क्र. 102/2020 असा होता. या प्रकरणातील आरोपी हे अंडरट्रायल होते. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकुण 13 साक्षीदार तपासण्यात आले परंतु साक्षीदाराकडुन आरोपी विरोधात कसल्याही प्रकारचा सबळ पुरावा सिध्द झाला नाही. व आरोपी यांनी अलका हनुमान जोगदंड हिचा खुन केला हे सरकार पक्ष
सिध्द करु शकला नाही. या प्रकरणात आरोपीच्या वकीलांनी अभ्यासपूर्ण युक्तीवाद करुन आरोपी सचिन तुकाराम कदम व तुकाराम रामभाऊ कदम यांना चौथे जिल्हा व सत्र न्यायाधिश बीड यांनी निर्दोष मुक्त केले आरोपीतर्फे अ‍ॅड. अविनाश पं. गंडले यांनी काम पाहिले त्यांना या कामी अ‍ॅड. बप्पा माने, अ‍ॅड. इम्रान पटेल, अ‍ॅड. गोवर्धन पायाळ, अ‍ॅड. तेजेश नेहरकर, अ‍ॅड. किरण मस्के, अ‍ॅड. राजाभाऊ बनसोडे, अ‍ॅड. सुरक्षा जावळे, अ‍ॅड, शुभम सरवदे, अ‍ॅड. सचिन गिरी, अ‍ॅड. राजेश शिंदे, अ‍ॅड. वैभव धन्वे यांनी सहकार्य केल.
------------------