संगमेश्वर महिला अर्बन शुभारंभ मोठ्या उत्साहात साजरा ...

महंत नवनाथ महाराज व महादेव महाराज चाकरवाडीकर महाराजांच्या शुभहस्ते
नाळवंडी दि 26 वार्ताहर - बीड तालुक्यातील नाळवंडी या ठिकाणी संगमेश्वर महिला अर्बन बँकेचा शुभारंभ पार पडला या वेळी या बँकेचा शुभारंभ टेकडी या ठिकाणचे महंत नवनाथ महाराज व महादेव महाराज चाकरवाडीकर या दोन महाराजांच्या शुभहस्ते पार पडला .
बीड तालुक्यातील नाळवंडी या ठिकाणी तंबरे परिवार यांच्या संगमेश्वर महिला अर्बन शाखा क्रमांक 2 चा शुभारंभ पार पडला . या नामकरणाची शाखा क्रमांक 1 हि बीड या ठिकाणी स्थित आहे .काल या कार्यक्रमावेळी बोलताना या बँकेचे चेअरमन कल्याण तंबरे म्हणाले कि हा फक्त बँकेचा शुभारंभ नसून या ठिकाणच्या तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या हक्काच्या व्यासपीठचा शुभारंभ आहे .या प्रकारच्या व्यक्तव्यातून तंबरे यांनी येथील नागरिकांची या अर्थ सेवेची वाट मोकळी केली आहे . तसेच हि बँक तुमचं आमचं सर्वांचं हितगुज साधणारी नक्कीच भविष्यात सध्या ठरेल असा विश्वास देखील या वेळी कल्याण तंबरे यांनी ठिकाणीच्या नागरिकांना दिला .
या वेळी संगमेश्वर महिला अर्बन को . ऑप . क्रिडित सोसायटी लि. बीड शुभारंभाला अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावलेली दिसून आली यामध्ये मा . अनिल जगताप ,जगदीश गुरखुदे ,नितीन धांडे ,राजेंद्र राऊत ,स्वरूप राठोड ,गणेश राऊत ,संतोष मेहेत्रे ,संजय काळे तसेच गावातील इतर प्रतिष्टीत नागरिक या वेळी हजर होते .

