बाळासाहेब केदार यांची भाजपा विमुक्त आघाडीच्या प्रदेश सचिव पदी निवड

Maharashtra

बीड जिल्ह्यात केदार यांच्या निवडीचे जल्लोषात स्वागत
मुंबई/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेशाच्या सचिव पदी शिरूर कासार तालुक्याचे भूमिपुत्र बाळासाहेब केदार यांची नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब,भाजपा प्रदेश सरचिटणीस संजयजी केनेकर, तगछढ सेलचे प्रदेशाध्यक्ष राहुल भैया केंद्रे,भाजपा प्रदेश चिटणीस किरणजी पाटील,यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

 शिरूर कासार तालुक्याचे शिक्षण संस्थानीक  बाळासाहेब केदार हे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांपासून भारतीय जनता पार्टीचे  गेल्या 15 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. शिरूर कासार तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. विविध शाळेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांच्या शिक्षणासोबतच समाजकारणातही ते सक्रिय आहेत. संपूर्ण राज्यभर त्यांचा मोठा संपर्क असून भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सचिव पदी त्यांची नियुक्ती झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.