हिवाळी अधिवेशनावर टमरेल मोर्चा काढणार --डॉ जितेंद्र ओव्हाळ


दिव्यांग मंत्रालयाची खोकेगिरी अन बेजबाबदार
धोरणा विरोधात करणार टमरेल मोर्चा आदोलन
बीड/प्रतिनिधी
कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळा अनुदान देण्यात दुजाभाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच चे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सोमवारी मुंबईत केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच च्या मुंबईत आयोजित बैठकीत डॉ जितेंद्र ओव्हाळ सोमवारी बोलत होते या वेळी दिव्यांग मंत्रालयाच्या भोंगळ कारभारा वर जोरदार टीका केली कायमविनाअनुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्यात खोकेगीरी चा धंदा मंत्रालयातुन चालु आहे काही मोजक्याच शाळानां अनुदान देण्यात दिव्यांग मंत्रालयया चा सपाट का जुन्या शाळा खडयात घालायच्यात का असा सवाल उपस्थित करत पाहारेकरी मदतनीस यानां पुर्ण वेतन श्रेणी का नाही तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांच्या कारभारीची चावकशी करा या व दिव्यांग मंत्रालय दिव्यांग आयुक्त पुणे च्या बेजबाबदार धोरनाचा निषेध म्हणून सात डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशणा वर डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच हजारो कार्यकर्ते बरोबर घेऊन विराट मोर्चा काढणार असल्याचे निवेदन दिव्यांग सचिव अभय महाजन यांना सोमवारी डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिले.

