नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी खासदार प्रीतम मुंडे यांचा थेट दानवे यांना फोन


खासदार प्रीतम मुंडे यांनी अधिकार्यांना धरले धारेवर,
परळीकडून तात्काळ काम सुरु करण्याच्या दिल्या सूचना
अमळनेर रेल्वे स्थानकाची ‘स्पॉट पाहणी’ केली
बीड/प्रतिनिधी
नगर- बीड -परळी रेल्वे मार्गाचे काम करत असताना अधिकार्यांकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. परळी कडून काम सुरू करण्यात अडचणी असून त्या तत्काळ सोडाव्यात अशी मागणी खासदार प्रीतम मुंडे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे फोनवरून केली.
यावर दानवे यांनी आता संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीमध्ये या प्रश्नावर बैठक घेऊ असे आश्वासन दिले .खासदार प्रीतम मुंडे यांनी रेल्वे कामाच्या आढावा घेण्यासाठी अमळनेर येथे रेल्वे स्थानकाच्या कामाची पाहणी करत अधिकार्यांना जाब विचारला. एकमेकांकडे बोट दाखवू नका, कामे गतीने करा अशा सूचनाही खासदार प्रीतम मुंडे यांनी यावेळी केल्या.

