भविष्यात राजेंद्र मस्केंचे राजकारण बहरणार - माजी मंत्री सुरेश नवले

Beed

मस्के इन्फ्रास्ट्रक्चर RMC प्लांटचा शुभारंभ व दीपावली स्नेह मिलन थाटात संपन्न ..!
बीड/प्रतिनिधी
दीपावली पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर कै. तुकाराम गुरुजी नगर, चर्‍हाटा रोड बीड येथे मदन मस्के यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर ठचउ प्लांटचा भव्य शुभारंभ नारायण गडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, बंकटस्वामी संस्थांचे महंत ह.भ.प. मेंगडे महाराज, रामगड संस्थांचे महंत ह.भ.प. योगीराज महाराज, बेलेश्‍वर संस्थानचे महंत ह.भ.प. तुकाराम महाराज भारती यांच्या शुभहस्ते आणि माजी मंत्री सुरेश नवले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उद्योगपती विजयराज बंब, दिलीप गोरे,  द कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. अर्चना कुटे, सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, कल्याण आखाडे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के परिवाराच्या वतीने दिवापली स्नेहमिलन फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

महंतांच्या वतीने ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी शुभेच्छा व्यक्त करून आशीर्वाद दिले.तर  वंचित आघाडीचे नेते अशोक हिंगे, विजयराज बंब, सौ. अर्चना कुटे यांनी समयोचित मनोगत व्यक्त करून मस्के परिवाराला शुभेच्छा दिल्या.मनोगत व्यक्त करताना प्रा. नवले म्हणाले की, राजेंद्र मस्के आणि मदन मस्के हे बीड मधील वेगळे प्रस्थ आहे. मदन काका अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. दूरदृष्टी ठेऊन उभा केलेला ठचउ प्लांट यशस्वी होईल. राजेंद्र बाबू अत्यंत बुद्धिवंत राजकारणी आहे. मी राजकारण करतो, तुम्ही भावंड व्यवसाय करा हा सल्ला मस्के परिवारांनी सत्यात उतरवला. व्यवसाय आणि राजकारणात मोठा फरक आहे. राजकारणात लोकांवर अवलंबून राहावे  लागते. राजकारणातला ग्राहक चतुर आहे. राजेंद्र मस्केंचा संपर्क आणि काम उत्तम असल्याने उदार मनाने मी त्यांचे कौतुक करतो. नारायण गडाचे महंत तब्बल दोन तास मस्के परिवाराला देतात म्हणजेच राजेंद्र मस्के परिवारावर नगद नारायणाची कृपा आहे. भविष्यात राजेंद्र मस्केंचे राजकारण निश्‍चितपणे बहरणार आहे. अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. दीपावली स्नेहमिलानाच्या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यवसाय, क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून राजेंद्र मस्के परिवाराला शुभेच्छा दिल्या.