बीडचे भूमिपुत्र बाजीराव चव्हाण यांचे आरोग्य क्षेत्रातील काम प्रभावी

शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडूनही कौतुक
संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे राज्याची चौफेर प्रगती होत आहे. सरकारच्या आरोग्य विषयक कार्याची व्यापक जनजागृती धर्मवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जात आहे. बाजीराव चव्हाण यांच्या कार्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी या भेटीत कौतुक केले.
--------------------
शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख विजय पाटील यांची बाजीराव चव्हाण यांच्या संर्पक कार्यालयाला सदिच्छा भेट
बीड/प्रतिनिधी
धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष, बीडचे भूमिपुत्र बाजीराव चव्हाण यांचे आरोग्य क्षेत्रातील काम अत्यंत प्रभावी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी गौरव केला.
आरोग्यसेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झालेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथील संपर्क कार्यालयात विजय पाटील यांनी बुधवार, 8 नोव्हेंबर भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना सचिव संजय मोरे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी जिल्हा प्रमुख चंद्रकांत नवले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख महादेव मतकर, निखिल मस्के,अरुण घुमरे,कृष्णा यादव,विलास मस्के, संदिप माने,आदींची उपस्थिती होती. बाजीराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात विजय पाटील आणि सचिव संजय मोरे यांचा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि धर्मवीर प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी यथोचित सन्मान केला.
पुढे बोलताना विजय पाटील म्हणाले, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे, याचे श्रेय त्यांच्या सामाजिक बांधिलकीला दिले पाहिजे.

