कै . यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी चाटे यांच्यावरील बोगस गुन्हा अखेर रद्द

केज प्रतिनिधी :-
केज शहरातील कै. यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजी चाटे यांच्यावर भाव बांधकीच्या वादातून दि . 15 ऑक्टोबर 2022 रोजी केज येथे पोलीस ठाण्यात सौ गयाबाई रामधन चाटे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नंबर 467/2022 मधील कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता ते आज दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालय खांडपीठ औरंगाबाद यांनी रद्द केला आहे
केज शहरातील कै. यशवंतराव चाटे शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजी चाटे यांच्यावर त्यांच्याच घरातील सावत्र चुलते श्री रामधनयशवंतराव चाटे यांच्या पत्नी सौ गयाबाई रामधन चाटे यांच्या कौटुंबिक वादविवादातून केज पोलीस ठाण्यात दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी खोटी फिर्यादी देवून संस्थेचे सचिव श्री शिवाजी चाटे यांच्यावर कलम 420 , 465 , 467 , 468 , 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फिर्यादी आणि संस्थेचे सचिव यांच्या वकिलांनी मा न्यामुर्ती श्री आर . जी . अवचट व एस.ए देशमुख यांच्या समोर संस्थेचे सचिव यांचे वकील ऍड मल्हारी अदाटे व व्ही डी व्होन यांनी न्यामुर्ती यांच्या समोर युक्तिवाद करून कशा प्रकारे संस्थेचे सचिव यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले होते हे सिद्ध करून देण्यात आले व दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मा न्यामुर्ती यांनी अखेर श्री शिवाजी चाटे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आज रद्द केला असून त्यामुळे संस्थेची बदनामी करणाऱ्याला एक प्रकारे चांगलीच चपराक बसली आहे व संस्थेचे सचिव शिवाजी चाटे हे निर्दोष असल्याचे मा न्यायालयाने सांगितले त्यामुळे एक प्रकारे ब्लॅकमेलिंग , खंडणी खोर , खोटे गुन्हे दाखल करणार्यांना कोर्टाने चांगलेच फटकारले आहे . केज शहरातील कै. यशवंतराव चाटे शिक्षण संस्था ही चांगले विध्यार्थी घडवण्याचे काम करीत असल्याचे सर्व स्थरातून बोललं जात आहे

