मस्के  इन्फ्रास्ट्रक्चर RMC प्लांटचा शुभारंभ

Beed

दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थित राहवे - राजेंद्र मस्के 

बीड / प्रतिनिधी 
 दिपावली पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मस्के इन्फ्रास्ट्रक्चर RMC प्लांटचा भव्य शुभारंभ आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के परिवारातर्फे आज दीपावली स्नेह मिलन व फराळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

 दि १४ नोव्हेंबर २०२३ मंगळवार रोजी सकाळी १०.०० वा.  क्षेत्र नारायण गडाचे महंत ह. भ. प. महंत शिवाजी महाराज,  ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प. महंत योगीराज महाराज रामगड, ह.भ.प. महंत महादेव महाराज भारती,  ह.भ.प. श्रीरंग महाराज डोंगरे यांच्या शुभहस्ते  आणी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत इन्फ्रास्ट्रक्चर RMC प्लांटचा भव्य शुभारंभ संपन्न होणार असून, परंपरेनुसार याही वर्षी दिपावली पाडव्याच्या निमित्ताने दिपावली स्नेहमिलन (फराळाचा कार्यक्रम)  कै. तुकाराम गुरुजी नगर,चऱ्हाटा रोड बीड येथे सकाळी 10 वा.आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सर्व हितचिंतक मित्र परीवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी आग्रहाची  विनंती. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
स्थळ – कै. तुकाराम गुरुजी नगर,चऱ्हाटा रोड बीड