पारधी समाजातील महिलेची धिंड प्रकरणात सत्ताधार्यासह जिल्हा प्रशासनाची दातखीळी बसली -- डॉ जितेंद्र ओव्हाळ 

Beed

 एस पी  ठाकूर  यांची बदली करा-डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचची मागणी
बीड/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील वाळूज मध्ये पारधी समाजातील महिलेसोबत घडलेला प्रकार अतिशय निंदनीय होता या वर आज पर्यंत आरोपींना अटक का नाही हा सवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी उपस्थित केला. 
 या बाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले कि आष्टी पोलिसाचे बेजबाबदार धोरण पारधी महिले बाबत घडलेल्या प्रकरणात चौकशी काय करण्यात आली आरोपींना अटक का केली नाही एखाद्या महिलेवर झालेल्या आत्मघातकी घटनेला तुम्ही गांभीर्याने का घेत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षण आंदोलनावेळी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी बेताल वक्तव्य केलं ती पोस्ट सोशल मीडियात फिरली व दंगल चालु  झाली याचा विचार पोलीससांनी करून आमदार प्रकाश सोळंके यांना अटक करण्यानची मागणी करत येत्या दोन दिवसांत काय ती भूमिका घ्या नसता या  बाबत पोलिस प्रशासनाला बांगड्या चा हार घालून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला असून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची तातडीने बदली करण्याचीही मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शनिवारी केली