पाटोदा येथे आमदार बाळासाहेब आजबे काकांनी केला नवनिर्वाचित सरपंच व ग्रा प सदस्यांचा सत्कार

Patoda

सरळ साधा स्वभाव असणारा व जनतेच्या प्रश्‍नासाठी झटणारी

व्यक्ती म्हणजे आ.बाळासाहेब आजबे- दिपक दादा घुमरे
पाटोदा/प्रतिनिधी
आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आज पाटोदा येथे नवनिर्वाचित ग्रा प सरपंच व ग्रा प सदस्यांचा सत्कार केला या प्रसंगी पाटोदा व शिरूर तालुक्यातील सरपंच व सदस्यांचा सत्कार केला.

पाटोदा तालूक्यातील वहाली , उंबरविहीरा , चुंबळी , रोहतवाडी , जाधववाडी घोळवेवाडीभराटवाडी , तांबराजुरी येथील तसेच , वाघीरा , मंझरी , गंधनवाडी , मुगगाव या गावातील सरपंच व ग्रा प मेम्बर यांचा आज पाटोदा येथील रोहिदास मंगल कार्यालयात संपन्न झाला या प्रसंगी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आपल्या भाषणात सांगितले कि कार्यकर्त्यांनी जे यश मिळवले ते अविस्वामर्नीय आहे आपण कृती आराखडा तयार करून गावचा विकास साधावा जनतेला विश्‍वासात घेऊन काम करावे व गावचा विकास करावा असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी केले , या प्रसंगी प्रास्ताविक पर भाषणात ता अध्यक्ष दिपक दादा घुमरे यांनी सांगितलें कि बाळासाहेब आजबे काका हे विकासात्मक राजकारण करणारी व्यक्ती असून सरळ साधा स्वभाव असणारी जनतेच्या प्रश्‍नासाठी झटणारी व्यक्ती असून सर्वसामान्य व्यक्ती चे नेत्रत्व करणारी व्यक्ती आहे आजबे काकांच्या आदेशावरून तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करू अशी भावना व्यक्त केली सहकार महर्षी बांगर यांनी सांगितले कि तालूक्यातील सहकारी संस्था  च्या माद्यमातून व ग्रा प च्या माद्यमातून तालुक्याचा विकास साधेल या प्रसंगी महादेव नागरगोजे , विश्‍वास नागरगोजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन नामदेव सानप यांनी केले तर सय्यद  साजिद यांनी सूत्र संचलन केले या प्रसंगी शिरूर तालुक्यातील 4 ग्रा प चे सदस्य व सरपंच हजर होते कार्यक्रमास भाऊसाहेब भराटे , गुलाब घुमरे , गवळी अप्पा , बन्सी खाडे , अण्णासाहेब लवांडे ,बाबासाहेब शिंदे ,बप्पासाहेब जाधव , नामदेव सानप , रुपेश बेद्रे , मंगेश पवार , आनंद घुमरे , युवराज कोकाटे , राजेंद्र सकुंडे , अविनाश पवार , विठल तांबे , डॉ संजीव मिसाळ , जुनेद शेख ,नितीन बामदळे आदी सह सरपंच सेवा सोसायटी चेअरमन उपास्थित होते