लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख मोरे यांचे बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवले यांच्या निवासस्थानी जोरदार स्वागत


---------------------------
बीड जिल्ह्यातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचे काम -माजी मंत्री सुरेश नवले
२३ जुन २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांना बीडमधुन पाठींबा दिल्यांनतर शिवसेनेच्या पाच हजार कार्यकर्त्यांनी सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन प्रवेश केल्यापासुन बीड मतदार संघ, शिरूर, गेवराई पाटोदा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचवत आहोत. शिंदे साहेबा सारखे अठरा अठरा तास काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. सर्वस्तरातील लोकांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. बीड मतदार संघातील १५५ गावे २५ वाड्या तांडे , बीड शहर घरोघरी जावुन लोकांची भेट घेणार आहे. जिल्ह्यातील सर्व समाजातील घटकांना बरोबर घेणार आहे असे प्रा. माजी मंत्री सुरेश नवले यांनी सांगीतले.
------------------------------------
प्रतिनिधी | बीड
शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापुसाहेब मोरे, मुंबई येथील शिवसेनेचे विभागप्रमुख दिलीप शिंदे यांनी शिवसेना नेते प्रा.सुरेश नवले यांच्या आई निवासस्थानी गुरूवारी हजारो शिवसैनीकांच्या उपस्थीतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी शिवसेने नेते प्रा. सुरेश नवले यांच्या बीड शहरातील सुभाषरोडवरील आई निवासस्थानी शिवसेनेचे बीड लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख बापुसाहेब मोरे, मुंबई येथील शिवसेनेचे विभागप्रमुख दिलीप शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी मराठी संस्कृती प्रमाणे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा प्रमुख ॲड.चंद्रकात नवले, उपजिल्हा प्रमुख भरत जाधव, आष्टी तालुका प्रमुख कुमार शेळके, पंचायत समिती सदस्य गुंडीबा नवले, शिरूर, पाटोदा आष्टी उपजिल्हा प्रमुख जालींदर वांढरे माजी तालुका प्रमुख आसाराम आमटे, शिवसेनचे माजी शहरप्रमुख नगर परिषद सभापती संजय नलावडे, माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक शहाजी गायकवाड, माजी शहर प्रमुख राकेश जाधव, शिवसेनचे युवा नेते कृष्णा वांगीकर यांच्यासह शिवसेना माजी तालुकाप्रमुख परमेश्वर डोंगर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नगर जिल्हा संपर्क प्रमुख उज्वला भोपळे , माजी तालुका प्रमुख मनिष भोसकर, हरी जगताप, सरंपच तात्या शिंदे, मच्छिंद्र जोगदंड , दादाहरी जोगदंड, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन भास्कर सानप, पौंडूळचे सरपंच गणेश नवले. युवा नेते ॲड. सचिन गायकवाड ,ॲड. बी.बी माेरे, शिवणीचे सरपंच विजय सुपेकर , गणेश जाधव, सरपंच बिभीषण चव्हाण, रोहीदास कदम, देव नवले, राजेश नवले, बालाघाटचे उसतोड मजुर कामगार सेनचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे ,संभाजीराव कदम, कोल्हारवाडी सरंपच रामचंद्र विर , ललित अब्बड, नरेश शर्मा, नितीन आधापुरे, प्रभाकर जाधव, शहादेवराव घोडके , उपतालुका प्रमुख नितीन दिवे,माजी उप तालुका प्रमुख विठ्ठल शिंदे ,वनश्री सखाराम शिंदे, नगरसेवक बाबुराव परळकर, नगरसेविका सरस्वती महाकुंडे, पोलिस पाटील काशीनाथ जोगदंड, दादाहरी जोगदंड, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. धर्मेंद्र भोपळे ,संजय मोटे , एस.आर जगताप ,बाबाजी भिंगले , साहेबराव राठोड, विजय काटे, सरपंच गणेश मंझरे शिवाजीराव ढगे, राजेंद्र ढवळे,लखन जाधव माजी तालुका प्रमुख तुकाराम उगले,महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख खडकीकरताई , सिराज पठाण माजी उपजिल्हाप्रमुख सरोजनी पाटील, भागीरथी जाधव , शितलताई पिंगळे, मिराताई पवळ, वंदनाताई भडके, स्मिताताई नवले , अंजलीताई नवले,लताताई नवले, आदी उपस्थीत होते. यावेळी बोलतांना बाळासाहेब मोरे, ॲड.चंद्रकांत नवले यांची भाषणे झाली.

