आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर-आ बाळासाहेब आजबे


बीड :- जिल्ह्यातील उर्वरित 52 मंडळाचा दुष्काळ यादीत समावेश झाल्याने आष्टी पाटोदा शिरूर तिन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून कृषी मंत्री ना धनंजय मुंडे यांनी या तिन्ही तालुक्याचा समावेश केल्या बद्दल आमदार बाळासाहेब आजबे यांनी आभार व्यक्त केले आहेत , आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी कृषी मंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे या बाबत वारंवार पाठपुरावा केला होता , बीड जिल्यातील उर्वरित सर्व मंडळाचा समावेश या यादीत ना धनंजय मुंडे यांनी करण्यासाठी प्रयत्न केल्याने मा मुख्यमंत्री मा उपमुख्यमंत्री यांचे सुद्धा आभार मानले आहेत केले आहेत , आष्टी पाटोदा हे तिन्ही तालुके नेहमी दुष्काळाच्या छायेत असतात म्हणून मीठ मोठ्या जलसिंचन योजना मंजूर करण्यासाटी गेल्या 4 वर्ष्यापासून प्रयत्नशील आहे यात बऱ्याच अंशी यश येत असून उर्वरित विकास कामे लवकर मार्गी लागतील असे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना भावना व्यक्त केल्या

