पीपल्स रिपब्लीकन पार्टीच्या बीड शहर उपाध्यक्ष पदी शेख निसार यांची निवड

Beed

बीड( प्रतिनिधी)

पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे यांच्या हस्ते दि.30 ऑक्टों. 2023 रोजी बीड शहरातील तरुण कार्यकर्ते शेख निसार यांची बीड शहर उपाध्यक्ष पदी पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली. यावेळी शेख अखील, शेख माजेद, फयीज महंमदखान उर्फ पापाभाई, शेख परवेज, अफान खान, सय्यद साबेर, शेख रफीक, शेख इफ्तेखार, शेख शादाब, शेख अतीख, शेख अफरोज इत्यादींनी पीपल्स रिपब्लीकन पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष शेख फेरोज, जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.