रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरूवात

Beed

बीड प्रतिनिधी
 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विघ्नहर्ता गणरायाच्या व श्रीमंत सावता महाराजांच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्यानिमित्ताने चकलंबा येथे रौप्य  महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत तुलसी रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा दि.26 ऑक्टोंबर रोजी  सुरू झाला.

रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व विश्‍वविख्यात श्री. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी सामुदायीक पारायण तथा संगीत तुलसी रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील मंडळीनी 29ऑक्टोंबर रोजी  ह.भ.प. रामायणाचार्य  रामरावजी महाराज ढोक यांच्या रामकथेचे याचा लाभ घ्यावा तसेच 30/10/23 रोजी ह.भ.प. भागवताचार्य बाळुमहाराज गिरगावकर ,31/10/23 रोजी  ह.भ.प. महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज ,1/11/2023 रोजी गु.ह.भ.प. वारकरी भूषण  उमेशजी म. दशरथे  तर 2/11/23 रोजी ह.भ.प. महंत गुरूवर्य नामदेव महाराज  शेकटेकर यांचे  11 ते 1 या वेळेत काल्याचे किर्तन होणार आहे नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तसेच वरील सर्व किर्तनाचा चकलंबा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान ह.भ.प. परमेश्‍वर महाराज वाघमोडे यांनी केले आहे.