पारधी समाजातील महिलेची धिंड काढून नग्न अवस्थेतील व्हिडिओ बाबत पोलिस अधीक्षक यांनी तातडीने भूमिका जाहीर करावी - डॉ जितेंद्र ओव्हाळ

जिल्हाधिकारी महिला मग भेट का देत नाहीत?
बीड/ जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महिला आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे मग याच जिल्ह्यात पारधी समाजातील महिलेची धिंड काढली नग्न अवस्थेतील व्हिडिओ पसरवण्यात आल्यानंतरही पिडीत महिलेला जिल्हाधिकारी यांनी भेट का दिली नाही असा सवाल डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी उपस्थित केला .
आष्टी तालुक्यातील वाळूज गावात शेतात जाण्यास मज्जाव करत पारधी समाजातील महिलेला विवस्त्र केले जाते भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी समोर हे अत्यंत निंदनीय असून पोलिसांनी या प्रकरणात विशेष तपास यंत्रणा कामाला लावून आरोपींना अटक करावी त्याच बरोबर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात तातडीने भूमिका जाहीर करावी अन्यथा या बाबतीत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत गुरुवारी दिला

