बी.बी. जाधव यांची बलभीम महाविद्यालय विकास समिती सदस्यपदी नियुक्ती

बीड/ प्रतिनिधी
येथील सी.ए. बी.बी. जाधव यांची बलभीम महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समिती निमंत्रिक सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही समिती नियुक्ती केली जाते.
येथील सीए बी.बी. जाधव यांचा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग असतो. सामाजिक प्रश्नांवर ते सातत्याने पाठपुरावाही करत असतात. या सर्व कार्याची दखल घेवून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, सचिव आ.सतीश चव्हाण व उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनुसार मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम महाविद्यालय विकास समितीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना पाठवण्यात आले असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. या नियुक्तीबद्दल बी.बी.जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.

