सैनिक विद्यालयाचा जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलांचे दोन्ही संघ विजयी


विभागीय शालेय खो खो स्पर्धेसाठी निवड
बीड/प्रतिनिधी
जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत सैनिकी विद्यालय बीड शाळेचे 17 व 19 वर्षे मुले दोन्ही संघांनी प्रथम स्थान पटकावले असून विभागीय शालेय खो खो स्पर्धेसाठी दोन्ही संघांची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डाके एस ए यांनी दिली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड आयोजित बीड जिल्हा शालेय खो खो स्पर्धा गेवराई येथील जगदंबा आयटीआयच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सैनिकी विद्यालय बीडच्या 17 वर्ष मुले व 19 वर्ष मुले या दोन्ही संघांनी पुन्हा एकदा विजेतेपद मिळवले आहे . 17 वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात न्यू हायस्कूल गेवराई संघाला डावाने पराभूत करून सलग 9 व्या वर्षी सैनिकी विद्यालय बीड संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. प्रवीण पांढरे , प्रताप तुपे, प्रसाद दळवे, सुरज पवार यांनी अष्टपैलू चमक दाखवून संघाला विजेतेपद मिळवून दिले. 19 वर्षाखालील मुलांच्या सैनिकी विद्यालय संघाने देखील आपल्या गटात जिल्हा स्पर्धेमध्ये प्रथम स्थान कायम ठेवले आहे. या दोन्ही संघांची औरंगाबाद विभागीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातून निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना राज्य क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे सर, डॉ. अविनाश बारगजे, वैभव भागवत यांचे मार्गदर्शन लाभत आहे लाभत आहे. प्राचार्य श्री डाके एस ए यांनी स्वतः स्संपूर्ण स्पर्धेदरम्यान मैदानावर हजर राहून खेळाडूंचे मनोबल वाढवले व त्यांना प्रोत्साहित केले. नवगण शिक्षण संस्था राजुरी नवगनचे सचिव तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर साहेब, युवा नेते डॉ. योगेशभैय्या क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी वि टी देशमाने, गुटे सर यांच्यासह प्राचार्य श्री डाके एस ए, डॉ. अविनाश बारगजे, शिवाजी पवार सर सर्व शिक्षक व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
17 वर्षाखालील मुले विजयी संघ -
प्रसाद दळवे , विनायक बिरलींगे, बळीराम शेळके , संतोष डोळस , अरविंद पांढरे , प्रताप तुपे , सुदर्शन पवार , सुरज पवार , अभिषेक शिंदे , प्रथमेश सोनवणे , ओंकार धनवे , ओंकार काळे , रवी फुफाटे , हरीओम मांडवे , गजानन गाढवे.
19 वर्षाखालील मुले विजयी संघ -
अनुराग मार्कड , माऊली शिंदे , ईश्वर शिंदे, गोपाळ चौधरी, आकाश शेळके, पंकज दातखीळ , संजय दातखीळ, यशराज ससाने , सुजल पवळ , यश रुपनर , सुग्रीव जाधव, बालाजी पवार , विजय माळी , गौरव जाधवर, प्रवीण पवार.

