ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखा पुन्हा सुरू

Beed

कर्मचार्‍यांना सहकार्य करावे कुटे ग्रुपचे आवाहन 
बीड/प्रतिनिधी
शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्व शाखा दोन दिवस बंद झाल्यानंतर आज धानोरा रोड येथील शाखा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेट विषयी दोन दिवसात झालेल्या चर्चेत आणि शाखा बंद झालेल्या असताना विविध आफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत होत्या आज ग्राहक, ठेवीदार आणि व्यापार्‍यांच्या व सुरेश कुटे यांच्यावर प्रेम करणार्‍या व्यक्तींनी त्यांना आग्रह करून आज बीड शहरातील सर्व शाखा सुरळीत चालू करण्याचा आग्रह धरल्याने व कर्मचार्‍यांना सपोर्ट दिलासा देण्याचे काम या जनतेने केल्यामुळे त्यांच्या आग्रा खातर सुरेश कुटे यांनी आज ज्ञानराधा मल्टीस्टेटची धानोरा रोड ही शाखा सर्व ग्राहक व व्यापारी यांच्या सहकार्याने उघडी करून या ठिकाणी या बँकेतील दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात झाली आहे.
यावेळी शाखा उघडता वेळेस सर्व व्यापारी, ग्राहक व ठेवीदार उपस्थित होते यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी विट्टल गुजर,आबा खाडे,राम सावंत नितीन क्षीरसागर,ढाकणे सर्,राजेश डवरे कर्मचारी महादेव दाभाडे साहेब, फुळझलके साहेब, आजिणाथ आखाडे, दामकर साहेब, सिध्देश्‍वर, माने साहेब, नेहाल ,रोहन शिंदे, राहुल कारंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.