मुख्याधिकारी अंधारे यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा - अनिल तुरुकमारे

Beed

औरंगाबाद आयुक्त कार्यालयास समोर बीड

न.प.मुख्याधिकारी विरोधात धरणे आंदोलन 

 बीड प्रतिनिधी -

बीड नगर परिषदच्या मुख्याधिकारी पदाचा चार्ज अंधारे मॅडम यांनी घेतल्या पासुन स्वच्छ शहर सुंदर शहर बीड हे दुर्गंधीमय झाले आहे. सर्वत्र गटारी नाली तुंबल्या आहेत. शहरात सर्वत्र कचऱ्याचे विगारे साचले आहेत. चार महिन्या पासुन शहरातला कचरा रस्त्यावर, गल्लीबोळ तसाच साठला आहे. मुख्याधिकारी अंधारे यांची कार्यकीर्द वादग्रस्त ठरत आहे.

शहरातील कुचरा साफ करणाऱ्या 26 महिलांवर 353 खोटा गुन्हा पदाचा गैरवापर करून दाखल केला आहे. कचरा साफ करणेचे टेंडर राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली अर्धवट कालावधीत बंद केले आहे. त्यामुळे चार महिन्या पासून शहर बीड शहर हे दुर्गंधीमय झाले आहे. शहरातील रस्ता, नाली ईतर कामे नियमाप्रमाणे नाहीत, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेच्या मुख्याधिकारी अंधारे यांच्या कार्यकाळातील कामाची चौकशी करण्यात यावी तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत शहरातील सी.सी. रस्ता व नाली बांधकामाची चौकशी करण्यात यावी, तसेच शहरात पिण्याचे पाणी 15 ते 20 दिवसाला सोडण्यात येते. दलित वस्तीचे कामे इतर ठिकाणी करण्यात आले आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेचे पी.टी. आर. बोगस असून या योजनेत पैसे कमावण्याचा प्रकार सुरु आहे प्रत्येकी कामामध्ये व योजनेमध्ये अनियमितता स्पष्ट दिसुन येत आहे. शहरात खासबाग येथील बालीका डेंग्युच्या साथीने मरण पावली या सर्वाला मुख्याधिकारी अंधारे जबाबदार आहे. शहरात सर्वत्र शासकीय व खाजगी हॉस्पीटल मध्ये डेंग्यूच्या आजाराचे ण वाढले आहेत. वादग्रस्त मुख्याधिकारी अंधारे यांच्या कार्यकाळातील सर्व कामाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात येऊन त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे व डेंगूच्या साथीने बालीका मृत्यु प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यासाठी आज दि. दि. 17.10.2013 रोजी आपले विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन कंत्राटी महिला  स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.