पप्पु कागदेंच्या नेतृत्वाखाली केज तहसीलवर महामोर्चा धडकला

बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
व खाजगीकरण, कंत्राटीकरण थांबवा
-------------------------------
केज तालुका रिपाइंच्यावतीने केज शहरात काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये गायरान धारक, रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी केल्याबद्दल मोर्चाचे संयोजक तथा रिपाइं केज तालुका अध्यक्ष दिपक कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
-------------------------------------------
केज / प्रतिनिधी
बीड जिल्हा दुष्काळगस्त जाहिर करण्यात यावा. कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या 1990 च्या निर्णयाला 2005 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात यावी. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यात यावे. या मागण्यांसह विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरुन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसीलवर मंगळवार (दि.17) ऑक्टोबर रोजी महामोर्चा धडकला.
महामोर्चात पप्पू कागदे म्हणाले की, राज्य सरकारकडून शिक्षणाचे खाजगीकरण व नोकर्यांचे कंत्राटीकरण वेगवेगळे जी.आर. काढून करण्यात येत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरण करुन राज्य सरकारकडून सर्व समाज बांधवांच्या मुलांना शिक्षणापासून व नोकर्यापासून वंचित ठेवण्याचे काम करण्यात येत आहे.राज्यभरातील 62 हजार जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण व शासकीय नोकर्यांचे कंत्राटीकरण करुन कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय रद्द करण्यासाठी आगामी काळात सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून लढा उभारणे व आपल्या न्याय व हक्कासाठी संघटीत होणे ही खरी काळाची गरज आहे.
केज शहरातील क्रांतीनगर व रमाई नगर येथील झोपडपट्टी वासीयांना कबाला पावत्या व पी टी आर मिळवून देण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.अंत्यविधीसाठी स्मशानभूमी हा महत्त्वाचा भाग असून केज तालुक्यातील दलित समाज बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
केज रिपाइंच्यावतीने केज तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या महामोर्चास राजू जोगदंड, गोवर्धन वाघमरे,उत्तम मस्के,मझर खान, रविंद्र जोगदंड, राहुल सरवदे, भास्कर मस्के,गौतम बचुटे, दिपक कांबळे, निलेश ढोबळे,किसन तांगडे, बापू पवार, दशरथ सोनवणे, लक्ष्मण सिरसट, महादेव उजगरे, सचिन कागदे, धोंडीराम सिरसट,संदिपान डोंगरे, अजित सिरसट, मायाताई मिसळे, अनिता वाघमारे, चिकूताई आंधळे, शिला वाघमारे, रेश्माताई जोगदंड, रेखाताई सरवदे, शालुबाई मस्के, प्रभाकर चांदणे, अश्रूबा तुपारे, प्रमोद दासूद, राजेश सोनवणे, अविनाश जोगदंड, भैय्या मस्के,भैय्या साळवे, शाम वीर, चेतन चक्रे, रमेश निशिगंध, विकास आरकडे, मिलिंद भालेराव, भारत हजारे, नवनाथ खाडे, म्हलारी कांबळे, रतन वाघमारे, सुभाष तांगडे, सतीश शिनगारे, भाऊसाहेब दळवी, अक्षय कोकाटे, विलास जोगदंड, अप्पा मिसळे,सूरज काळे,रोहित कांबळे, परमचंद बनसोडे, मिलिंद तरकसे, विष्णू वाघचौरे, भगवान बचुटे, रघुनाथ ढालमारे, दिलीप खाडे, मोहन हजारे,मल्हारी कांबळे, रोहित बचुटे, महादेव गालफाडे,नामदेव वाघमारे यांच्यासह हजारोच्या संख्येने गायरान धारक महिला, रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

