ग्राहकांचा विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेटने कायम जपलेला असुन अफवांवर विश्वास ठेवु नका-कल्याण आखाडे, सौ.संजीवनी देसाई

बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यासह देशभरात बहुचर्चित अशा कुटे ग्रुपच्या माध्यमातून गगण भरारी घेणाऱ्या मा.सुरेशजी कुटे साहेब यांनी बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक कुटूंबाना आधार देणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटने ग्राहकांचा विश्वास कायम जपलेला आहे,आणि यापुढेही तो कायम राहिल,म्हणून ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
ज्ञानराधा मल्टीस्टेट ही एक लोकसंपर्कातील मल्टीस्टेट बद्दल संयम बाळगून आपणच आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.
कुटे ग्रुपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील हजारो नागरिकांना, तरुणांना आणि तरुणींना कुटे ग्रुपमुळे जिल्ह्यातच कामाची संधी मिळाली आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेट त्याहूनही जुनी असून नावाजलेली मल्टीस्टेट आहे.आजवर ज्या विश्वासाने आपण सर्वांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट वर विश्वास दाखवला,प्रेम दिले तसेच प्रेम या प्रतिकुल परिस्थीतीमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटला द्यावे व ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन बीड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष मा.कल्याण आखाडे व उपाध्यक्ष सौ.संजीवनी देसाई तसेच संचालक अर्जुन राऊत ,श्रीकृष्ण कातांगळे,संतोष सपकाळ,अशोक राऊत ,राहुल शिंदे ,रवी वाघमारे,सखाराम राऊत,यांनी केले आहे.

