बोरफडी गावात दारू विक्री बंद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांच्या नेतृत्वाखाली दारू विक्री बंद
बीड /बीडसत्ता
बीड तालुक्यातील बोरफडी येथील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बप्पासाहेब घुगे तुम्ही पुढाकार घेवून गावात दारू बंद करावी अशी विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांनी एलसीबीचे पी.आय. गणेश मुंडे तसेच पिंपळनेरचे पीआय कैलास भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये बैठक घेऊन सर्वांनी एक मुखाने गावामध्ये दारूबंदीचा ठराव केला. यावेळी गावातील उपस्थित लालासाहेब जी घुगे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सुमनभाऊ कुठे व गावचे पोलीस पाटील नवनाथ कुठे , माजी सरपंच नवनाथ भाऊ कुठे ,माजी सरपंच मारुती घुगे, माजी सरपंच ज्योतीराम घुगे तसेच मुकादम बंडू घुगे ,बाळू घुगे ,नारायण घुगे ,कांताराम जाधव, हनुमंत घुगे, तुळशीराम घुगे महाराज , चांगदेव घुगे सर व सर्व गावातील लोक उपस्थित होते यांनी पीआय गणेश मुंडे ,पी आय कैलाजी भारती यांचे दारू बंद केल्यामुळे गावकर्यांनी आभार मानले.

