खंडाळा येथील जि.प.शाळेला प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांची भेट

Beed

बीड /बीडसत्ता
बीड तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा केंद्र मांजरसूंभा शाळेला भेट दिली यावेळी त्यांचा सोबत शालेय पोषण अधीक्षक तुकाराम पवार हे होते.

    शाळेत येताच कार्यालयात जाऊन सत्करासारख्या सोपस्कारांना बगल देत प्रत्येक वर्गात जाऊन शैक्षणिक गुणवतेबाबत विद्यार्थी व शिक्षकांशी सुसंवाद साधला.सर्व विध्यार्थीना विविध विषयांवर बोलते केले व प्रगतीचा आढावा घेतला.उपयोजित गणितासारख्याविषयांतील एकंच उदाहरण तीन वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकवले.चांगल्याबाबीसाठी कौतुकाची थाप तर सुधारण्यासाठी सुयोग्य सूचना केल्या.
  विद्यार्थी व शिक्षक  अधिकार्‍याच्या सहवासाने इतके भारावून गेले की ते गेट पर्यंतसर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे निरोप देण्यासाठी गेले. सदरची शाळा भेट सर्वांसाठी प्रेरणा दायी ठरली.