.सफाईगार-पहारेकरी-मदतनीस-कंत्राटीपदांच्या वेतनात तफावत का ?-डॉ जितेंद्र ओव्हाळ

Majalgaon

समान वेतन देण्याची मागणी
माजलगाव-- दिव्यांग शाळांवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर दिव्यांग आयुक्त कार्यालय तातडीने बंद करा अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी माजलगाव येथे सोमवारी केली
       सफाईगार पहारेकरी मदतनीस हे कंत्राटी कर्मचारी दिव्यांग मूलांसाठी मरमर काम करत आहेत मग त्यांना मिळणार्‍या वेतनात तफावत का करता असा सवाल डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी उपस्थित केला  धुळे जळगाव कोल्हापूर बुलढाणा या जिल्ह्यात 16500 वेतन,तर नागपूर औरंगाबादला 13000 वेतन, अमरावती यवतमाळ पुणे नाशिक उस्मानाबाद गडचिरोलीत 9000 वेतन हि तफावत दिव्यांग मंत्रालय तसेच दिव्यांग आयुक्त याना दिसत नाही का वारंवार निवेदनं देण्यात येत आहेत याची जाणीव ठेवून सफाईगार पहारेकरी मदतनीस या पदानां राज्यात सरसकट समान वेतन व वेतनश्रेणी का देत नाही येत्या आठ दिवसात याचा विचार दिव्यांग मंत्रालय दिव्यांग आयुक्तांनी करावा यात चालढकल केल्यास संबंधित आधिकार्‍यांना रस्त्यावर काढून जाब विचारला जाईल असा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सोमवारी माजलगाव येथे कंत्राटी कर्मचारी व डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या बैठकीत दिला या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत ओव्हाळ, शेख सलिम.अकबर शेख,सनि गायसमुद्रे, राधेश्याम खेत्री,राजकन्या मनेरे.यमुना पंडित संगीत मेंडके ,उषा करे,सुनिता जाधव ,राधा इंगोले  अनिल गायकवाड,सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते