कागद,फॉईल किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवणे धोकादायक?

Beed

मुंबई /प्रतिनिधी
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी अन्न विक्रेते आणि ग्राहकांना खाद्य पदार्थ साठवण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी किंवा पॅकिंग करण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे त्वरित थांबवावे असे आवाहन केले आहे.(FSSAI) च्या सीईओ जी कमला वर्धन राव यांनी सांगितले की, वृत्तपत्रांमध्ये वापरल्या जाणार्‍या शाईमध्ये असणारे केमिकल हे बायोएक्टिव्ह असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात यामुळे मुख्यतः पोटाशी संबंधित विकार होऊ शकतात शिवाय याचा आरोग्यावर दूरगामी वाईट परिणाम होऊ शकतो.