सांची बुद्ध विहार येथे बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व वर्षावास समापन कार्यक्रम

पु. भिक्खु ग्यानरक्षीत थेरो, पु. भिक्खु धम्मशील थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धम्मदेसना ; कार्यक्रमास उपस्थित राहावे सांची बुद्ध विहार ट्रस्टी यांचे आवाहन
बीड(प्रतिनिधी):- शहरातील अंकुश नगर भागातील सांची बुद्ध विहार येथे बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व वर्षावास समापन कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता सांची बुद्ध विहार ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शहरातील बौद्ध बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांची बुद्ध विहार ट्रस्टी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पुज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या अथक प्रयत्नातुन व मार्गदर्शनातुन सांची बुद्ध विहार अंकुशनगर (द.) या विहारास गगन मलिक फाऊंडेशन मार्फत (६ फुट) उंच असलेली पंचधातुची सोनेरी बुद्धमुर्ती दान स्वरूपात मिळालेली आहे. या बुद्धमुर्तीची प्रतिष्ठापणा व वर्षावास समापन कार्यक्रम रविवार दि ०८ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १०.०० वा. भव्य मिळवणुकीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११.०० वा. भिक्खु संघास भोजनदान दिले जाणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० ते ०९ वा. पर्यंत सर्वांना भोजनदान दिले जाणार आहे.यावेळी प्रशांत वासनिक यांच्या वाढदिवसानिमीत भगवान विद्यालय मित्र मंडळ तर्फे खिरदान करण्यात येणार आहे. दुपारी ०१ वाजता बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व धम्मदेशना कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी पु. भिक्खु ग्यानरक्षीत थेरो, कार्यालयीन सचीव महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ,
पु. भिक्खु धम्मशील थेरो, हिंगोली / बीड सचीव प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड हे प्रमुख धम्म देसाना देणार आहेत. यावेळी पु. भिक्खु धम्मधर थेरो जालना पु. भिक्खु नागसेन बोधी थेरो उदगीर, पु. भिक्खु धम्मबोधी थेरो पानगांव यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड तहसीलदार सुहास बाबुराव हजारे, आर.पी.आय.ए.प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे,बीड उपविभागिय पोलीस अधिकारी संतोष शिवाजी वाळके, देवगिरी प्रतिष्ठाण बीड संस्थापक अध्यक्ष प्रदीप रोडे,शिवाजीनगर बीड पोलीस निरीक्षक केतन राठोड,पोलीस उपनिरीक्षक पाटोदा के. डी. भंडारे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी विस्तार अधिकारी दिपक जोगदंड, नगरसेवक भैय्या मोरे, नगरसेवक विष्णु वाघमारे,नगरसेवक विकास जोगदंड, नगरसेवक रंजीत बनसोडे,नगरसेवक
गणेश वाघमारे सामाजीक कार्यकर्ते राम वाघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक सांची बुद्ध विहार ट्रस्ट अंकुश नगर बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

