बिग बजेट अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला नागरिकांची मोठी गर्दी

Beed

बीडच्या ‘आदित्य शिक्षण संस्थेत‘ पार पडले ‘यशस्वी प्रमोशन’

बीड (प्रतिनिधी)
 बांधकाम व्यावसायिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे टाकळीचे (ता.केज) सुपुत्र राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत एका बिग बजेट सिनेमाची निर्मिती करून मुलगा दिपराजची प्रमुख भूमिका असलेला ’अंकुश’ नावाचा चित्रपट निर्मित केला आहे. या चित्रपटाचे  प्रमोशन बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्थेते मंगळवारी (दि.३) मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

 येत्या 6 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत शहरातील आदित्य शिक्षण संस्थेत झाले. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता दीपराज घुले, नंदकिशोरजी मुंदडा, कुंडलिकजी खांडे, दत्ता भाऊ बारगजे,सर्जेराव तात्या तांदळे,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या सदस्या डॉ. आदितीताई सारडा, आदित्य शिक्षण संस्थचे संचालक डॉ. आदित्य सारडा, भगवान केदार, भाजपाचे देविदास नागरगोजे, रमाकांत मुंडे, कृष्णा मुंडे, डॉ. नेहरकर, नवनाथ आण्णा शिराळे, सुशिलाताई मोराळे, बप्पासाहेब घुगे, मुरलीधर ढाकणे, पेठ बीडचे ठाणेप्रमुख पी.आय. काशिद, सुनिल मिसाळ, संध्या ताई बारगजे, अजय सवई,चंद्रकांत फड, विष्णु घुले,राणा चव्हाण  यांच्यासह आदित्य शिक्षण संस्थेचे सी.ए. गिरीष गिल्डा सर, संतोष लहाने सर, राहुल खडके सर, डॉ आरुण मुंडे सर,  डॉ. पंकज कडू सर, डॉ. जैन सर,डॉ. हिमांशु सर, भुतडा सर, डॉ. हिंगणे सर, अमोल सानप सर, सतीश कचरे सर  यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी आणि बीडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत फड, सुशांत खवतड, धनराज लाटे, चंद्रकांत मिसाळ यांच्यासह विष्णू घुले मित्र परिवार, अंकुश फिल्म टीम, आदित्य संस्थेने प्रयत्न केले.

कलाकारांसह मान्यवरांचा सत्कार
सर्व ‘अंकुश’ टीमचा आदित्य शिक्षण संस्थेतर्फे अंकुश चित्रपटाचा केक बनवून व सर्वांचा शाल श्रीफळ, बुके देऊन सत्कार करण्यात आला. आदित्य शिक्षण संस्थेत झालेल्या बिग बजेट अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला मिळालेला प्रतिसाद पाहुन सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता दीपराज घुले आणि त्यांची टिम भारावून गेली होती. यावेळी त्यांनी चित्रपटातील कलाकार, लोकप्रिय ठरलेली गीते, सादरीकरण यासह चित्रपटाविषयी इतर माहिती दिली. तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

चांडाळ चौकडीच्या टीमने जिंकली मने
मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी कलाकारांसह बारामती येथील चांडाळ चौकडी ही विनोदी टीम होती. त्यातील कलाकार रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब यांनी कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.