.महाबीज शुगरग्रेज बियाणे वाटपाला सुरुवात

Beed

नाळवंडी /बीडसत्ता

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजने अंतर्गत दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध होण्यासाठी या योजनेअंतर्गत शूगरग्रेज  बियाणांची वाटप आज नाळवंडी या ठिकाणच्या पशुवैधकीय श्रेणी २ या ठिकाणी करण्यात आली .
मागील काही महिन्यापासून पाऊस न झाल्याने या ठिकाणी तालुक्यातील पशुधनाला चार मुबलक असल्याने  या योजने अंतर्गत दुभत्या जनावरांचे चारया विना हाल होऊ नये. यासाठी हे महाबीज कंपनीचे शुगरग्रेज  बियाणे शेतकऱ्यांना वितरित  केली जात आहेत  . या बियांच्या मार्फत काही दिवसाचा चारा प्रश्न हा मार्गी लागावा हा या योजनेमागचा हेतू आहे . या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी ५० किलो इतके बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत . यामुळे  काही अंशी  चार प्रश्नाला स्थिगिती  मिळण्याचे संकेत आहेत .
यावरच आज नाळवंडी या ठिकाणी पशुवैधकीय श्रेणी २ या ठिकाणी डॉक्टर आगासे व कर्मचारी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या बियानांची वाटप करण्यात  आली . या वेळी योजनेचे  शेतकरी लाभकर्ते अभिमान राऊत ,लक्ष्मण काळे ,आत्माराम मेहेत्रे ,अभिमान मिरकले ,लहू नन्नवरे ,प्रल्हाद मेहेत्रे ,शिवगणेश मिरकले, सावता काळे  आदी शेतकऱ्यांनी या बियाणांचा लाभ घेतला आहे .