उत्तर महाराष्ट्र विभागातही तुलशी कॉलेजची छाप

अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात तुलसी कॉलेज
ऑफ फॅशन डिझाईनच्या मुलींची विजयी पताका
बीड(प्रतिनिधी):- श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र विभाग अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव 30 सप्टेंबर 2023 रोजी डब्ल्यू.के.बी महिला महाविद्यालय धुळे येथे येथे उत्साहात पार पडला. या अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या मुलींची विजयी पताका फडकावली आहे.
उत्तर महाराष्ट्र विभाग अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात 14 महाविद्यालयांनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग नोंदविलेला होता. यामध्ये तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या 21 मुलीं सहभागी झाल्या होत्या. फोक डान्स स्पर्धेमध्ये तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनला आदिवासी परंपराला डान्स मध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच ऑन द स्पॉट पोस्टर पेंटिंग यामध्ये सुवर्णा सोनवणे हिला तिसरा क्रमांक भेटला आहे. माईम मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. या युवा महोत्सवासाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांनी मेहनत घेऊन हे पारितोषिके मिळवलेली आहेत. त्याबद्दल देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनच्या प्राचार्या अश्विनी बेद्रे, विभाग प्रमुख प्रा. विद्या अवघडे यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

