.लोकनेत्याच्या कष्टातून उभारलेल्या वैद्यनाथ साखर कारखाना वाचविण्यासाठी कट्टर समर्थकाची मदत

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी जिल्हा परिषद
सदस्य रामदास बडे यांनी दिला पाच लाख रूपयाचा चेक
रायमोहा (प्रतिनिधि )लोकनेते गोपीनाथ मुंडे (साहेब) यांनी त्यांच्या कष्टातून उभारलेल्या परळी तालूक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सुडबुध्दीनी कारवाई करण्यात आल्याने संपुर्ण महाराष्ट्रात याचे प्रचंड पडसाद उमटत आहेत.
बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत व अनेक जण मदतसाठी पुढे येत असतांनाच पिंपळनेर जिल्हा परिषद गटाचे अभ्यासू कार्यतत्पर सदस्य रामदास (नाना) बडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या नावाने पाच लाख रूपयाचा चेक दिला आहे व विरोधकांना चपराक दिली आहे. तरी जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे यांनी केलेली मदत ही फुल नाही फुलाची पाखली आहे.अश्या अनेक मदती आल्यातर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर सुडबुद्धीनी केलेली कारवाईतून सुटेल व माजी मंत्री पंकजाताई पुन्हा राजकारणात सक्रिय होऊन शेतकर्यांच्या वैद्यनाथ कारखाना पुर्व पदावर आणतील असे रामदास बडे म्हणाले.

