आरोपी जावेद सय्यद यास सहा महिने शिक्षा व 8 लाखाचा दंड

5 लाखाचा धनादेश न वटले प्रकरणी
आरोपी जावेद सय्यद यास सहा महिने शिक्षा व 8 लाखाचा दंड
बीड/बीडसत्ता
आरोपी जावेद रहीम सय्यद रा.भाटवडगाव ता.माजलगाव याने फिर्यादी अॅड.सागर शहाजीराव नाईकवाडे यांच्याकडून घरगुती व व्यवसायीक अडचण आहे असे सांगून स्वकम रु.500000 /-(पाच लाख) रूपये घेतले. ऑगस्ट 2015मध्ये मागणी केली होती.परंतु आरोपीने फिर्यादीस नोव्हेंबर2015 रोजी परत करील असे सांगितले.फिर्यादी यांना नोव्हेंबर 2015मध्ये रक्कमेची गरज असल्याने फिर्यादीने आरोपीस सदरची रक्कम मागणी केली असता आरोपीने त्याचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा कोथरूड,पुणे खाते क्र. 62424987958 चा धनादेश क्र.702634 रक्कम रु.5,00,000 /- (पाच लाख रु.) दिनांक 16.11.2015 रोजीचा दिला व सदर धनादेश वटला जाईल, अशी हमी फिर्यादी यांना दिली. आरोपीच्या शब्दावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत उपरोक्त धनादेश वटनावळीस दि. 16.11.2015 रोजी टाकला असता, सदरील धनादेश न वठता संबंधित बँकच्या अपुरी रक्कम (FUNDS INSUFFICIENT ) या शेर्यासह दिनांक 18.11.2015 रोजी परत आला. फिर्यादी यांनी आरोपीस धनादेश न वठल्यामुळे वकीला मार्फत दि. 14.12.2015 रोजी सदरच्या धनादेशा वरील रक्कम रु.5,00,000/- (पाच लाख रु.) मागणी करणारी नोटीस आरोपीच्या अचुक पत्त्यावर पाठवली. सदर नोटीस घेण्यास आरोपीने इन्कार केला. नोटीसची माहिती मिळूनही आरोपीने मुदतीत धनादेशावरील रक्कम आरोपीने फिर्यादी यांना दिलेली नाही. सदरील नोटीसची माहिती होऊनही आरोपीने फिर्यादी यांना नोटीसच्या मुदतीत सदरील चेकची रक्कम रु.5,00,000 /- (पाच लाख रु.) परत केली नाही म्हणून फिर्यादी यांनी आरोपींविरोधात कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टप्रमाणे प्रमाणे प्रकरण मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी साहेब बीड यांचेकडे दाखल केले.त्यानंतर फिर्यदीचे विकीलीचे शिक्षण पूर्ण झालेनंतर फिर्यादी अॅड. सागर नाईकवाडे यांनी त्यांचे प्रकरण स्वतः चालवले सदर प्रकरणात फिर्यादीची साक्ष नोंदवण्यात आली त्यानंतर आरोपी व इतर दोन साक्षीदार यांची साक्ष नोंदवण्यात आली फिर्यादीच्या वतीने न्यायलयासमक्ष सादर करण्यात आलेले कागदपत्रे व पुरावे व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयासमक्ष दाखल केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यास गृहीत धरून मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब बीड यांनी आरोपीस धनादेश रक्कम अधिक 3 लाख दंड व सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली सदर प्रकरणात स्वतः फिर्यादी अॅड. सागर नाईकवाडे यांनी स्वतः काम पाहिले त्यांना अॅड. राजेश जाधव अॅड. सतीश गाडे. अॅड.बाळासाहेब गायकवाड,अॅड. संदीप जोगदंड, अॅड. सुधीर जाधव, अॅड.विवेक डोके यांनी सहकार्य केले.

