राज्य सरकारचं डोक फिरलं-डॉ जितेंद्र ओव्हाळ

वडवणीत करणार चक्काजाम आंदोलन
वडवणी/बीडसत्ता
सरकारी नौकरभरतीचं कंत्राटी करण जीआर नंतर अता समाजात प्रतिष्ठित तहसीलदार पदाचं कंत्राटी करण राज्य सरकार करणार याचा जाहीर निषेध डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या वतीने डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी शुक्रवारी केला.
वडवणी येथे एका कार्यक्रमानिमित्त डॉ जितेंद्र ओव्हाळ कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होते. यावेळी डॉ जितेंद्र ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला. समाजात प्रतिष्ठित पद तहसीलदार आहे. या पदाचं कत्राटी करण होत आहे या विरोधात रस्त्यावर या असे आव्हान करत 11 ऑक्टोबर रोजी वडवणी येथे चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला या वेळी तालुका अध्यक्ष सूरज खळगे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

