अमळनेर येथील रामनवमीच्या सप्ताहात सरपंच पुत्रास मानसन्मान न मिळाल्याने गावातील बांधवांना जबर मारहाण


.
अमळनेर येथील रामनवमीच्या सप्ताहात सरपंच पुत्रास मानसन्मान न मिळाल्याने गावातील बांधवांना जबर मारहाण
त्या निषेधार्थ अमळनेर गाव पूर्ण कडकडीत बंद
प्रतिनिधी बीड
पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील सप्ताह निमित्त अमळनेर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सप्ताहाचे आयोजन केलं होतं भव्य दिव्य असं कार्यक्रम रोज चालू होते राम जन्मदिवशी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना त्या ठिकाणी महाराजांचा सत्कार समारंभ करताना सरपंच पुत्र तेथे आल्याने त्यांचा मानसन्मान न झाल्याने त्यांना राग अनावर होऊन गावातील चार-पाच युवकांना शिवीगाळ करून धमकावून त्यांचं खूप दिवसापासून चाललंय आता त्यांचे बघून घेऊ काय करायचे त्यांना करू अशा शब्दात सरपंच पुत्राने भाष्य करून गावात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू करून गावातील प्रतिष्ठित व्यापारी सोमा शेठ पांगरे या प्रतिष्ठित व्यापाऱ्यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना बेदम मारहाण करून सरपंच पुत्रांनी गावातील अनिल हडदगुणे ,अभि पातुरकर, माऊली अष्टेकर, अन्य काही जणांना जबर मारहाण करून गावातील वातावरण दूषित करून टाकले आहे त्या निमित्ताने अंमळनेर गावामध्ये कडकडीत बंद करून निषेध व्यक्त करून गाव मोठ्या निर्णयाच्या अपेक्षित आहे संपूर्ण गाव एकत्रित येऊन सकाळी गणपती मंदिरासमोर चर्चा करून मोठ्या निर्णयाच्या अपेक्षित आहे अमळनेर येथील मारहाण झालेले युवक सध्या बीड येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत पुढील कारवाई सुरू असून लवकरच योग्य तो तपास करून कारवाई केली जाईल अशी चर्चा अंमळनेर मध्ये सुरू आहे

