पेंडगावला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

Beed

बीड- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंग जवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने (एमएल-01 एजी-3197) सहा जणांना चिरडले, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक माहिती अशी कि, बीड येथील दिनेश दिलीप पवार (रा.माऊली नगर बीड), पवन शिवाजी जगताप (रा.अंबिका चौक बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा.शिदोड ता.बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा ता.गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रा.रिलायन्स पंप परिसर बीड), विशाल श्रीकिसन काकडे वय 22 रा. शेकटा ता.शेगाव) हे पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते. यादरम्यानच धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे असलेल्या एसआर जीनिंगजवळ चालत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने त्या सहाही जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे, प्रसाद कदम यांच्यासह महामार्ग पोलीस गजानन जाधव, बालाजी ढगारे, तात्या बांगर, सदगर यांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.