श्री रेणुका देवी मंदिर घाटात भाविकांची कार ५० फूट खोल दरीत कोसळली

माहूर : दि. 30 मे प्रसिद्ध तिर्थक्षेत्र देवभूमी माहूर गडावरील आदिशक्ती आदिमाया श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आलेले  मंगरूळ दस्तगीर येथील सहा भावीक दर्शनादी करून आपल्या कारने परत जात असताना सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे रस्त्याचा नीट अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघाती वळणरस्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या घातक  'यु टर्न' जवळ सदरील अनियंत्रित कार उसळून सरळ ५० फूट खोल थेट दरीत कोसळल्याची क्षणभर काळजाचा ठोका चुकविणारी अत्यंत थरारक अपघाताची घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास घडली.नशिब बलवत्तर म्हणून रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात घनदाट जंगलातील खोल दरीत एवढ्या उंचीवरून खाली कोसळल्यानंतर अपघातग्रस्त कार झाडांना अडकल्याने कारमधील सहा भाविक किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावले व मोठा अनर्थ टळल्याने ''देव (झाड) तारी त्याला कोण मारी!' या उक्तिची प्रचिती आली.