*जिल्हा हळहळला सर्प सर्पदंशाने सख्या बहिण- भावाचा मृत्यू

किल्ले धारूर.(प्रतिनिधी)
धारूर तालुक्यातील कोयाळ या गावात सर्पदंशामुळे एकाच कुटुंबातील सख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना समोर आली आहे ही घटना 23 मे रोजी मध्यरात्री 12- 1 वाजण्याच्या सुमारास प्रदीप मधुकर मुंडे यांच्या राहत्या घरी घडली या हृदयद्रावक घटनेमुळे अख्खा गोळ्या गावावर शोककळा पसरली आहे
याबाबत मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षाची मुलगी कोमल व पाच वर्षाचा मुलगा शिवम रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला साप आणि दोघांनाही दंश केला दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत बिघडली तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वी दोघांनीही प्राण सोडले या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून मुंडे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्पदंशामुळे एकाच घरातील दोन निष्पाप जिवांचा गेलेल्या बळीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

