मदत कक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मिनी ट्रॅव्हल्स चे लोकार्पण

.कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मदत कक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मिनी ट्रॅव्हल्स चे लोकार्पण
बीड /बीडसत्ता
अण्णासाहेब पाटील महामंडळा चा लाभ मराठा समाजातील जास्तीतजास्त घटकापर्यत पोहचवण्या साठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या मदत कक्षाच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळा च्या नवीन लाभार्थी यांना महामंडळा च्या विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विनाशुल्क मदत केली जाते आतापर्यंत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या मदत केंद्राच्या मदतीने पन्नास हुन अधिक कर्ज प्रकरणे मंजूर झाली आहेत अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे किशोर गिराम पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू केलेले हे मदत केंद्र बीड जिल्ह्यामध्ये अतिशय छान पद्धतीने मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करत आहेत आज कै. आमदारा अण्णासाहेब पाटील यांच्या 90 व्या जयंती निमित्त साधून पाली येथील तुळजाई टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे दत्ता कारगुडे यांच्या महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून मंजूर झालेल्या मिनी ट्रॅव्हल्स चे लोकार्पण करण्यात आले. येणाऱ्या काळात बीड जिल्यातील मराठा तरुणांना जास्तीत जास्त महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार असल्याचे किशोर गिराम पाटील यांनी या वेळी बोलतांना सांगितले
या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे किशोर गिराम पाटील अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक गिराम पाटील अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक कालिदास थावरे सर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ पिंगळे पाटील अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मस्के पाटील सच्चिदानंद शिंदे सर भागवत बादाडे पाटील युवक शहराध्यक्ष उत्कर्ष धपाटे शहरा अध्यक्ष दत्ता शेळके मराठा तरुणांना महामंडळा च्या ऑनलाईन कामामध्ये मदत करणारे शांतीकुमार आगलावे सर सुमित गिराम पाटील सागर पोकळे अभिजीत मोरे सय्यद सादिक तसेंच लाभार्थी दत्ता कारगुडे हनुमान कारगुडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते

