बप्पासाहेब घुगे यांची राष्ट्रवादी जिल्हा सिरचिटणीस पदी निवड

बीड/बीडसत्ता
बीड तालुक्यातील एके काळील धडाडीचे व दबंग शिवसेनेचे नेते म्हणून ओळख असलेले बप्पासाहेब घुगे यांची आज प्रदेशाध्यक्ष मा . खा . सुनिलजी तटकरे व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचने प्रमाणे बीड जिल्हा राष्ट्रवादी सिरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे .
यावेळी घुगे यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलतांना घुगे म्हणाले की, माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीचे प्रमाणीक पणे संधीचे सोने करून दाखवेल व जिल्ह्यातील घराघरापर्यंत राष्ट्रवादीचा संदेश देवून राष्ट्रवादी आणखी कशी बळकट करता येईल असे प्रतिपादन केले. या मिळालेल्या पदाबद्दल बप्पासाहेब घुगे यांच्या समर्थकांकडून आनंद साजरा केला जात आहे.या मिळालेल्या जबाबदारीबद्दल राजकीय जाणकार मंडळींकडून घुगे यांचे अभिनंदन केले जात आहे.

