मूक मोर्चात अ.भा. मराठा महासंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे -- बापूसाहेब साळुंखे

Beed

बीड (शहर प्रतिनिधी)- मसाजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा 

व्हावी यासाठी दिनांक 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्व जातीय यांनी मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी सदरील मूक मोर्चाला मराठवाड्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अधिकारी, पदाधिकारी, कार्यकारणी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे यांनी केले आहे. 

मसाजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. परंतु अध्याप यातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेली नाहीत आधी सर्व गोष्टींचा असंतोष म्हणून व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शनिवारी बीड या ठिकाणी सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मियांकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चामध्ये अनेक राजकीय मोठी नेतृत्व सहभाग नोंदवणार आहे यामध्ये शरद पवार, अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे, सुरेश धस असे अनेक मातब्बर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तरी सदरील मोर्चामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे यांनी केले आहे.