बीडचे नवीन पोलिस अधिक्षक(एसपी) नवनीत कॉवत

Beed

नवनीत कॉवत हे २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
बीड /प्रतिनिधी
बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे जनसामान्यामध्ये पोलिसांबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवनीत कॉवत यांच्या समोर असणार आहे.

बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात अधिकच बदनाम झाला.  देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेवर सलग तीन दिवस वाढली चर्चा झाली. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.