बेभान दिव्यांग मंत्रालयासह आयुक्तालयाच्या विरोधात नागपूर हिवाळी अधिवेशनावर झेंडा मोर्चा   भानावर या - डॉ जितेंद्र ओव्हाळ 

Majalgaon

तत्कालीन सचिवानी दिशाभूल केली 
बीड -- दिव्यांग मंत्रालयाच्या बेजबाबदार धोरणाच्या विरोधात राज्यातील हजारो दिव्यांग शाळा कर्मचारी तसेंच विध्यार्थी बरोबर घेऊन  डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच राज्य अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृवाखाली पहिल्याच दिवशी मोर्चा काढला 
.  या बाबतीत डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले की राज्यात दिव्यांग शाळा दिव्यांग मुलांसाठी चालवल्या जात असल्याचा दिखावा दिव्यांग मंत्रालय त्याच बरोबर दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे करत आहे गेल्या  वर्षी हिवाळीअधिवेशनावर  आपण  टमरेल मोर्चा काढला होता यात तत्कालीन सचिव महाजन  उपसचिव घोडके यांनी मागण्या बाबतीत काहीच केले नाहीं याचा जाहीर निषेध करत आज परिस्थिती वेगळीच आहे विनाअनुदानित दिव्यांग शाळेना अनुदान नाहीं अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांना वेतन नाहीं थकीत वेतन नाहीं मुबलक निधी नाहीं  कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नाहीं 123 दिव्यांग शाळेना 100% अनुदान नाही या व दिव्यांग मंत्रालयाची कोणत्याही कामात हप्तेखोरी तसेंच दिव्यांग आयुक्त कार्यालयातील अनागोंधि  कारभाराची व घोटाळेबाज अधिकाऱ्याची चौकशी करा या व अनेक मागण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर पहिल्याच दिवशी हजारो कार्यकर्त्यासह विराट झेंडा मोर्चा काडून  डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिव्यांग मंत्रालायचा निषेध केला मागण्या पुर्ण न झाल्यावर मुंबईला मोर्चा काढणार असल्याचा इशारा या मोर्चात डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला