टिप्परने महिलेस उडविले !

Beed

बीड- शहरातील नगर रोडवर एका टिप्परने आज सकाळी स्कुटीवर असलेल्या महिलेले उडविले. यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.  

शहरातील नगर रोडचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या रस्त्यावर कसलेही प्रकारची दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन, रोजच अपघात होत आहेत.आज सकाळी 9:30 वाजता स्कुटी क्रमांक.MH 23 BK 3391 वरून जात असताना महिलेस टिप्पर क्रमांक MH 23W7111 ने धक्का दिल्याने महिला खाली पडून जखमी झाली.वेळीच महिला टिप्पर पासून बाजूला झाल्याने जीव वाचला. यावेळी सदरील महिलेस उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.