.अंबाजोगाईत तलवारी बाळगणार्याला पोलिसांनी घेतला ताब्यात

अंबाजोगाई /बीडसत्ता
अंबाजोगाई येथे तलवार बाळगणारा ममदापूर येथील आदित्य काटे या आरोपीला अंबाजोगाई पोलिसांनी अटक केली.
अंबाजेागाई शहरातील पाण्याची टाकी येथे आदित्य काटे हा हातात तलवार घेऊन फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाईचे पथक सदर ठिकाणी जावून अचानक छापा मारला असता आदित्य आनंद काटे (वय-19 वर्षे)याला ताब्यात घेतले त्याच्या जवळून एक तलवार मिळून आली.विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर,बालक कोळी ग्रामीण पोलीस स्टेशन, चाँद मेंढके पोलीस उपनिरीक्षक पोह गायकवाड, पोह.घोळवे, नागरगोजे, पो.कॉ.व्हावळे, होमगार्ड मुसा शेख यांनी त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने अंबाजोगाई तालुक्यातील राडी व ममदापुर शिवारात लपवून ठेवलेल्या 12 तलवारी किंमत अंदाजे 18 हजार रुपये किंमतीचे काढून दिल्या.याप्रकरणी काटेवर 364/23 कलम 4,25 भारतीय शस्त्र कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबाजोगाई पोलिसांच्या या कारवाईबदल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

