सुरेश धस यांचा पक्षश्रेष्ठीवर नाराजीचा सूर

आष्टी- आष्टी विधानसभेचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सुरेश धस यांची अद्याप देखील महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झालेली नाही. याच अनुषंगाने काल त्यांनी मतदारसंघात निर्णय बैठक देखील आयोजित केली होती. परंतु एवढे सगळे करून देखील पक्षश्रेष्ठींना जाग येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या मनातून नाराजीचा सूर निघत आहे.
काही वेळापूर्वी सुरेश धस यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पक्षाने आदेश दिल्यास दुसऱ्याचा प्रचार करीन अशा आशयाचा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून सुरेश धस यांची कशी दम कोंडी केली जात आहे हे स्पष्ट होत आहे.

