पहिल्याच यादीत नमिताताई मुंदडांचा समावेश

Kaij

केज/बाळासाहेब जाधव
भाजपने पहिल्या यादीचा मुहुर्त  काढला असून ९९ भाजप उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध केली. या पहिल्या यादीत केज विधानसभा मतदार संघाचा समावेश असून याठिकाणी विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांची उमेदवारी जाहिर करण्यात येणार आहे. कारण ही जागा मूळ भाजपच्या ताब्यात आहे. शिवाय आमदार नमिताताई मुंदडा यासुद्धा फिक्स उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला ’ग्रिन सिग्नल’ दाखवून प्रचार करण्यासाठी आवश्यक तो कालावधी देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला गेला आहे. 

 राज्यातील भाजपाचे जे उमेदवार फायनल आहेत किंवा ज्या जागा भाजपा लढणार आहे आणि ज्या जागेचे उमेदवार अंतिम आहेत. त्यांना प्रचाराला भरपूर अवधी मिळावा यासाठी भाजपाची पहिली ९९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची यादी उशीरा जाहिर करणे भाजपाला महागात पडले होते. त्यामुळे यावेळी ती चुक पुन्हा केली जाणार नाही याची दक्षता घेत उमेदवारी  यादी जाहिर केली गेली आहे.भाजपाच्या वतीने प्रसिद्ध  पहिल्याच यादीत केज विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. कारण या ठिकाणच्या आ.नमिताताई मुंदडा यांच्या कामाचा सकारात्मक अहवाल पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे.सर्वेक्षणात सुद्धा ही जागा उजवी दाखवली आहे. विकासात्मक कामामध्ये बीड जिल्ह्यात केज मतदारसंघ अव्वल ठरला आहे त्यामुळे त्याचा विचार करुन एक तरुण व उच्च विद्याभुषित, अभ्यासू आमदाराला पुन्हा उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचासुद्धा नमिताताईंच्या नावाला हिरवा कंदील असल्याने  पहिल्या यादीत नमिताताई मुंदडा यांचे नाव असणार हे अपेक्षितच होते. खर्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल परंतु उमेदवारी जाहिर झाल्यानंतर त्या कामाला गती येत असते त्या प्रमाणे आ.नमिताताई मुंदडा यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले  आहे.