राजेंद्र मस्केंनी दिला 'जिल्हाध्यक्ष' पदाचा राजीनामा !

Beed
बीड- येथील पंकज मुंडे यांचे कट्टर समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा रविवारी (दि.20) राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. राजेंद्र मस्के यांनी अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या वेळी होत असलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा राजीनामा देऊन आता पुढे कोणत्या पक्षात जाणार किंवा अपक्ष बीड विधानसभा लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
By Name:

