टोलनाक्याजवळ कारचा अपघात,दीड महिण्याच्या बालिकेचा हात तुटला


सिमेंटच्या मोठ्या गठ्ठु व दगडावरून आदळून कार उलटली
केज प्रतिनिधी /बाळासाहेब जाधव
केज पासून काही अंतरावर उमरी शिवरात बंद असलेला टोलनाक्याच्या जवळ कार उलटून अपघात घडला.
केज ते मांजरसुंबा महामार्गावर उमरी शिवारातील बंद असलेल्या टोलनाक्याजवळ वळणरस्ता वापरा फलक न लावताच टाकलेल्या सिमेंटच्या मोठ्या गठ्ठु व दगडावरून आदळून एक भरधाव कार उलटली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडला. अपघातात दीड महिन्याच्या बालिकेचा हात तुटून पडला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जाधव कुटुंबातील पाच जण कारमधून लातूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे ( एम एच २० / जी क्यू २९४९) चालकासह प्रवास करीत होते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान ही कार केज जवळील साखर कारखान्या समोरून जाणार्या महामार्गाच्या उतारावरून भरधाव वेगात धावत होती. उमरी शिवारात उभारण्यात आलेला टोलनाका अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे नाक्याजवळ सिमेंटचे मोठे गट्टु आणि दगड टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. संबंधित कंपनी एचपीएमने यासाठी कसलाही दिशदर्शक बोर्ड लावला नाही. त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार सिमेंटचे गट्टू आणि दगडाच्या ढिगार्यावर जाऊन आदळून उलटली.

