भाजी मंडईतून दुचाकी लंपास

बीड दि.३ (प्रतिनिधी)- शहरातील नवी भाजी मंडई येथून एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी लंपास केल्याची घटना (दि.२) रोजी दुपारी १ च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफरोज सरफराज बेग (वय-२४) व्यवसाय मिस्त्री काम रा. माळापुरी ता.जिबीड असे गाडी मालकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी कि, सोमवार (दि.२) रोजी दुपारी १ च्या दरम्यान फिर्यादी अफरोज सरफराज बेग यांनी आपली होन्डा शाईन कंपनीची काळया रंगाची गाडी (गाडी क्र.एम.एच.२३ बीई ७९०९) अंदाजे किंमत ९०,००० हजार रुपये हि नगरपालीकेच्या गाळयासमोरील पार्किंगमध्ये लावली होती. अफरोज बेग हे काही कामाकरिता भाजी मंडईत गेले असता तोपर्यंत चोरटयांनी गाडीचे लॉक तोडून गाडी लंपास केली. यामुळे फिर्यादी अफरोज सरफराज बेग यांच्या तक्रारीवून अज्ञात चोरट्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

